महाराष्ट्र

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारानिमित्त कोळी महासंघाच्या वतीने आ. रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांचा मेळावा संपन्न

सोलापूर (एसकेपी महाराष्ट्र न्यूज)

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारानिमित्त कोळी महासंघाच्या वतीने आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांचा मेळावा संपन्न झाला.

याप्रसंगी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, उपनेते देवानंद भोईर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसाठ, सचिव सतीश धडे, उपाध्यक्ष शिवशंकर फुले, ॲक्शन कमिटी प्रमुख चंद्रकांत घोडके, राज्य सदस्य तथा माढा लोकसभा अध्यक्ष आण्णासाहेब कोळी, उपाध्यक्ष विठ्ठल इरले, भाजपा पंढरपूर शहराध्यक्ष विक्रमभैया शिरसाट, माजी महापौर कंचना येनम, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुणभाऊ लोणारी, ऋषिकेश लोणारी यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार रमेश पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशाची प्रगती होत असून गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेकरीता प्रचंड कामे केली असल्याचे सांगितले. तसेच अनेक वर्षापासून आपल्या समाजाचा प्रलंबित असलेला जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवण्याकरीता शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असून हा प्रश्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुटणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे आपल्या देशाला महासत्ता बनविण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करणे गरजेचे असल्याने सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button