आरोग्य

वजन कमी करणं ते बॉडी डिटॉक्स, मूग डाळीच्या पाण्याचे फायदे…

– मूग डाळीचं पाणी तयार करण्यासाठी एका प्रेशर कुकरमध्ये 2 कप पाणी गरम करा.
– या गरम पाण्यात मूग डाळ टाका.
– आता यात चवीनुसार मीठ टाकून 2-3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
– यानंतर डाळ बारीक करा.
– आता यातील पाणी वेगळं काढा.
– आता डाळीचं पाणी पिण्यासाठी तयारआहे.

1) लठ्ठपणा कमी करण्यासाठी – अनियमित जीवनशैली आणि अवेळी खाणं यामुळं आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये लठ्ठपणाची समस्या सर्वात जास्त दिसून येत आहे. जर लठ्ठपणाची समस्या असेल आणि यामुळं हैराण असाल तर मुगाच्या डाळीच्या पाण्याचं सेवन करू शकता. या पाण्यात कॅलरीजचं प्रमाण कमी असतं आणि फायबर अधिक असतात. याशिवाय मूग डाळीच्या पाण्यानं मेटाबॉलिजम बूस्ट होण्यासही मदत होते. वजन कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

2) बॉडी डिटॉक्स होते – मूग डाळीच्या पाण्याचं जर नियमितपणे सेवन केलं तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास याची खूप मदत होते. यानं शरीराची आतून स्वच्छता होते. याशिवाय डाळीचं पाणी पिल्यानं लिव्हर, गॉल ब्लॅडर, रक्त आणि आतड्यांची स्वच्छताही होते.

3) डायबिटीज – मूग डाळीचं पाणी शरीरात इंसुलिनचं प्रमाण वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. याशिवाय मूग डाळीमुलं ग्लुकोजही नियंत्रणात राहतं. यामुळं डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.

4) डेंग्यू – डास चावल्यानं होणारा हा एक गंभीर आजार आहे. आजवर अनेकांना हा आजार झाला आहे. जर मुगाच्या डाळीच्या पाण्याचं सेवन केलं तर याने नक्कीच फायदा मिळेल. या डाळीच्या पाण्याच्या सेवनानं इम्युन सिस्टीमही मजबूत होते. डेंग्यू सारख्या गंभीर आजारापासूनही यामुळं बचाव केला जाऊ शकतो.

5) लहान मुलांसाठी फायदेशीर – मूग डाळीच्या पाण्यात अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात जे मुलांसाठीही जास्त फायदेशीर असतात. सर्वात खास बाब अशी की, या डाळीचं पाणी सहज पचतं. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही याचा खूप फायदा होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button