आरोग्यसामाजिक

मुलांचा मेंदू तल्लख बनविण्यासाठी रोज खायला द्या ‘हे’ पाच पदार्थ

सध्या मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि मुलांना सगळ्यात जास्त गरज असते ते म्हणजे त्यांचा मेंदू शार्प ठेवण्याची. कारण लहानपणी मुलं जे काही शिकतात ते त्यांना आयुष्यभर कामात येणार असते. आई वडीलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलं मन लावून अभ्यास करतात. मुलांचा खाणंपिणं चांगलं असेल तर मुलांचा मेंदू शार्प राहतो.

असं म्हणतात की, लहान मुलांनी बदाम खाल्ल्यास त्यांना बराचवेळ गोष्टी लक्षात राहतात. मुलांचा मेंदू चांगला होण्यासाठी आणि ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी तुम्ही काही गोष्टींचा आहारात समावेश करू शकता.

मुलांना स्नॅक्सप्रमाणेच सुक्या मेव्याच्या बीया तुम्ही भरवू शकता. सुक्या मेव्यात ओमेगा ३ फॅटी एसिड्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. यात व्हिटामीन ई सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. सुके मेवे किंवा बीया मेंदूसाठी उत्तम ठरतात. बदाम, अक्रोड, हेजलनट आणि भोपळ्याच्या बीयांना ब्रेन फूड्स असं म्हणतात.

व्हिटामीन सी युक्त संत्री खाल्ल्याने मुलांच्या मेंदूचा विकास होतो. व्हिटामीन सी व्यतिरिक्त संत्र्यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे ब्रेन सेल्स डॅमेज होत नाहीत. संत्र्याव्यतिरिक्त पेरू किंवा किव्हीचा आहारात समावेश करू शकता.

एंटी ऑक्सिडेंट्सने परिपूर्ण बेरीच मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असतात. स्ट्रॉबेरी, ब्लुबेरीज खाल्ल्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. बेरीजमुळे ब्रेन सेल्स कम्युनिकेशन चांगले राहते.

केल ब्रोकोली, पालक आणि पत्ता कोबी या हिरव्या भाज्यांमुळे मेंदूला पोषण मिळते. यात एंटी ऑक्सिडेंट्सबरोबरच व्हिटामीन, लुटेन आणि फॉलेट असते. या भाज्यांच्या सेवनाने मेंदूचे इंफ्लेमेशन कमी होते आणि मेमरी वेगाने होण्यास मदत होते.

जास्तीत जास्त फळं खाण्याचा प्रयत्न करा. फळं खाल्ल्याने मुलांची इम्युनिटी चांगली राहते. याशिवाय मुलांना तब्येतीचे विकारही उद्भवत नाही. फळांचे जास्तीत जास्त सेवन करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button