आरोग्य

पावसाळ्यात एकही माशी घरात येणार नाही, करा हे ५ उपाय…

एका ग्लासात एप्पल सायडर व्हिनेगर घेऊन त्यात डिश सोपचे काही थेंब मिसळा. नंतर किचनमध्ये वापरला जाणारा प्लास्टीकचा रॅप घेऊन एक ग्लास झाकून ठेवा त्यानंतर ग्लासवर प्लास्टीकचं रॅप रबराने टाईट करा. त्यानंतर टुथपिक घेऊन ग्लासच्या तोंडावर लागलेलं प्लास्टीक रॅपवर छिद्र करा. माश्या ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी ठेवा. माशा आत येण्याचा प्रयत्न करतील तेव्हा डिश सोपमुळे बाहेर येतील आणि आतच बुडू लागतील.

एक ग्लास पाण्यात २ चमचे भरून मीठ घ्या. त्यानंतर मीठ व्यवस्थित मिसळून घ्या. नंतर हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून माश्यांवर स्प्रे करा. ज्यामुळे माश्या दूर पळतील.

माशांना दूर पळवण्यासाठी तुम्ही पुदीना आणि तुळशीच्या पानांचा वापर करू शकता. यासाठी या दोन्हींची पावडर किंवा पेस्ट तयार करून पाण्यात मिसळा. हे पाणी माश्यांवर स्प्रे करा. एखाद्या किटकनाशकाप्रमाणे याचा परिणाम दिसून येईल.

हा उपाय करण्यासाठी एक ग्लास दूधात एक चमचा काळी मीरी आणि ३ चमचे साखर घाला. जिथे माश्या जास्त फिरतील त्या ठिकाणी दूध ठेवा. माश्या आकर्षिक होतीत आणि काळ्या मिरीच्या तीव्र वासाने मरून जातील.

हे एक कार्निवोरस झाड आहे जे किडे खाते. व्हिनस फ्लायट्रॅपचे रोज घराच्या बाहेर किंवा आत १ ते २ कोपऱ्यांवर लावा. या झाडाच्या प्रभावाने माश्या दूर राहतील. माश्या घरात जास्त येऊ नयेत यासाठी जास्तीत जास्त स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button