कल्पवृक्ष ॲकॅडमी तर्फे अंबाजोगाई येथे पोलीस/सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन…
![](http://skpmaharashtranews.com/wp-content/uploads/2024/04/images-1.jpeg)
अंबाजोगाई (एसकेपी महाराष्ट्र न्यूज)
राज्यात लवकरच पोलीस पदाची महाभरती होत असून पोलीस शिपाई, चालक आणि महाराष्ट्र सुरक्षा बलचा समावेश असलेली भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून त्या अनुषंगाने कल्पवृक्ष ॲकॅडमी, अंबाजोगाई येथे पात्र मुला-मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आगामी काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारासाठी कल्पवृक्ष ॲकॅडमी तर्फे अंबाजोगाई येथे भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असून त्यात शारीरिक व लेखी परीक्षेच्या तयारी तज्ञ मार्गदर्शकांकडून करून घेतली जाणार असून मुला-मुलींसाठी स्वतंत्र निवास, भोजन व गणवेशाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
![](https://skpmaharashtranews.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-21-at-08.54.52_d70c3bf3-1024x548.jpg)
तरी गरजू विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी आपला प्रवेश घेण्यासाठी कल्पवृक्ष ॲकॅडमी, यशवंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई येथे संचालक ॲड. कल्याण नेहरकर यांच्याशी 9822288386 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.