![](http://skpmaharashtranews.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-14-at-11.14.53_9af9b1b6-780x470.jpg)
करमाळा (एसकेपी महाराष्ट्र न्यूज)
रुद्र कैलास स्वामी या अकरा वर्षीय बालकाचे उकळलेल्या भाजीत पडल्यामुळे दहा टक्के शरीर भाजले होते. रुद्र स्वामी याला उपचारासाठी आर्थिक मदत म्हणून शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख आरती बसवंती यांच्या हस्ते ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे, करमाळा शहर प्रमुख कीर्तीताई स्वामी, कुर्डूवाडी शहर प्रमुख अनिता मोरे, चिखलठाण शाखाप्रमुख रेखा उंबर, महिला आघाडी करमाळा विधानसभा अध्यक्ष प्रियंका बाबीर, मार्केट उमरड शाखाप्रमुख सोनाली कोठावळे, सरबरो शाखाप्रमुख मोनिका भंडारे, सोगाव पूर्व अध्यक्ष सोनाली गोडगे, अपर्णा भोसले, देवळाली शाखाप्रमुख अश्विनी गणेश कर, द्रौपदी पांडुळे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
करमाळा विधानसभा महिला अध्यक्ष प्रियांका मारकड म्हणाल्या की, तालुक्यातील अडचणीत असलेल्या महिलांना मदत करण्याची भूमिका शिवसेना महिला आणि आघाडी घेतली असून जवळपास 400 महिला बचत गटाच्या माध्यमातून शिवसेनेचे विचार तळागाळात पोचवणार आहोत. आज याच भूमिकेतून ही 11 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.
ज्योतीताई शिंदे, उपजिल्हाप्रमुख महिला सोलापूर
करमाळा तालुक्यातील आतापर्यंत ३ हजार महिलांना बांधकाम कार्ड काढून देण्यात आले असून शेकडो महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली 102 महिलांना घरकुल देण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला असून जवळपास या माध्यमातून अडीच कोटी रुपयांचा निधी या महिलांना मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेना महिला आघाडी काम करत असल्याचे सांगितले.