पंढरपूर येथे प.पू. सद्गुरु सुरेशजी महाराज यांचा ‘चिदंबर नाम संकीर्तन’ सप्ताह सुरू होणार
![](http://skpmaharashtranews.com/wp-content/uploads/2024/04/Screenshot_2024_0403_160441.png)
पंढरपूर (एसकेपी झटका न्यूज)
पंढरपूर येथे चिदंबर महास्वामी देवस्थानचे मठाधिपती प. पू. सद्गुरु सुरेशजी महाराज यांचा चिदंबर नाम संकीर्तन सप्ताह रविवार दि. ३१/०३/२०२४ पासून सोमवार दि. ८/४/२०२४ पर्यंत अखिल भारतीय पद्मशास्त्री धर्मशाळा ८६२ गोविंदपुरा, पंढरपूर येथे सुरू आहे.
या सप्ताहामध्ये अखंड नाम संकीर्तन प्रवचन चालू आहे. तसेच भक्तांसाठी अल्पोपहार, चहा, महाप्रसाद व निवासाची सोय करण्यात आली आहे.
![](https://skpmaharashtranews.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-03-at-15.35.19_54a7347b-628x1024.jpg)
“शिव चिदंबर” नामाचे महत्त्व फार चांगले आहेत, याचा जरूर अनुभव घ्यावा. चिदंबर महास्वामी पांडुरंगाचे अवतार व त्यांचे शिष्य राजाराम महाराज तुकाराम यांचे अवतार. म्हणूनच सद्गुरु सुरेश महाराज यांनी नाम सप्ताह पंढरपूर येथे केला आहे. अधिक माहितीसाठी मॅनेजर नागेश पेंढाळ ७४९९०५१००५, रामकृष्णजी राव ९४४११८९८२३, वसंतरावजी नाडगीर ९३७९९१९११४, शाहूराज देशपांडे ८९९९७९७४४६ या नंबर वर संपर्क साधावा
या सप्ताहास भक्तांनी उपस्थित राहून याचा लाभ व सद्गुरूंचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
![](https://skpmaharashtranews.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-03-at-15.35.19_6aab325d-636x1024.jpg)