विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अकलूज येथे जंगी कुस्त्यांचे मैदान
![](http://skpmaharashtranews.com/wp-content/uploads/2024/04/download-1-1.jpg)
महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिक शेख विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. भारत मदने यांच्या लढतीत चांदीच्या गदेचा मानकरी कोण होणार ??
अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस, येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन शनिवार दि. ६/४/२०२४ रोजी सायंकाळी ४ वा. कर्मवीर चौक, महाळूंग रोड, महालक्ष्मी नगर, अकलूज, ता. माळशिरस, येथे करण्यात आले आहे.
सदर मैदानामध्ये शिवकन्या निशाताई शिंदे, इंदापूर यांच्यावतीने इनाम रुपये २ लाख ५० हजार रुपये व चांदीची गदा या इनामासाठी महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिक शेख हनुमान आखाडा पुणे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. भारत मदने, बारामती यांच्यात लढत होणार आहे. तसेच शिवकन्या निशाताई शिंदे, इंदापूर यांच्यावतीने इनाम रुपये १ लाख रुपयांसाठी महाराष्ट्र चॅम्पियन पै. कालिचरण सोलनकर गंगावेस तालीम, कोल्हापूर विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. मनोज माने, कुर्डूवाडी यांच्यात लढत होणार आहे. पै. दादा कोलटकर, खुडूस यांच्यावतीने इनाम रुपये ७५ हजार रुपयांसाठी महाराष्ट्र चॅम्पियन पै. सुरज मुलाणी, खुडूस विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. तात्या झुमाळे हनुमान आखाडा, पुणे यांच्यात लढत होणार आहे. तसेच पै. हेमंत आबा पाटील, इंदापूर यांच्यावतीने इनाम रुपये ५० हजार रुपयांसाठी आणि हरिमामा शिंदे, आरण, प्रकाश बंडगर, पेहे यांच्यातर्फे चांदीच्या गदा साठी मालक केसरी पै. सद्दाम पठाण, एकलासपूर विरुद्ध पै. विनोद पाटील, पुणे यांच्यात लढत होणार आहे. पै. अशोकभाऊ चोरमले, इंदापूर यांच्यावतीने इनाम रुपये ४० हजार रुपयांसाठी पै. भैया डोंबाळे, खुडूस विरुद्ध पै. अण्णा चव्हाण, काटे यांच्यात लढत होणार आहे. पै. नितीनभाऊ जगताप आणि पै. शरदभाऊ यादव यांच्या वतीने इनाम रुपये ३५ हजार रुपयांसाठी पै. सलमान पठाण, गारअकोले विरुद्ध पै. चैतन्य मारकड, शिरसोडी यांच्यात लढत होणार आहे.
![](https://skpmaharashtranews.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-03-at-11.10.17_2e9daea3.jpg)
तसेच पै. आकाश धोत्रे, टेंभुर्णी यांच्या वतीने इनाम रुपये ३५ हजार रुपयांसाठी पै. दीपक डोंगरे ,पाटकुल विरुद्ध पै. जितेंद्र वाळेकर, गारअकोले यांच्यात लढत होणार आहे. त्याचबरोबर नलिनी कोळी, म्हसवड यांच्या वतीने इनाम रुपये ३० हजार रुपयांसाठी पै. ईशा कोल्हटकर खेलो इंडिया सेंटर, लातूर विरुद्ध पै. रोशनी बोडके ताराराणी कुस्ती केंद्र, अकलूज यांच्यात लढत होणार आहे.
सदर कुस्ती मैदानास पैलवान बाळासाहेब निचळ यांची खंबीर साथ असणार आहे. तर या कुस्ती मैदानाचे समालोचन पैलवान धनाजी मदने सर, पंढरपूर हे करणार आहेत.
तरी सदर कुस्ती मैदानास मल्ल सम्राट, वस्ताद मंडळी, कुस्ती शौकीन आणि ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.