चिंचोलीने केली लंगडीमध्ये जिल्हा विजयाची हॅट्रिक
![](http://skpmaharashtranews.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-Image-2024-01-08-at-23.00.01_14fe0ae3-780x470.jpg)
चिंचोली (एसकेपी महाराष्ट्र न्यूज)
सोमवार दि. ०८/०१/२०२४ रोजी बार्शी येथे झालेल्या जिल्हास्तरीय लंगडी स्पर्धेच्या सामन्यात लहान गटांमध्ये जि. प. शाळा चिंचोली, ता. माढा, जि. सोलापूर या संघाने अंतिम फेरीत पापरी ता. मोहोळ या संघाचा १७ गुणांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली.
तर साखळी सामन्यांमध्ये प्रथम सांगोला या संघाला १२ गुणांनी पराभवाची धूळ चारत सामना एकतर्फी जिंकला. यानंतर उपांत्य फेरीत ताडसौंदणे, बार्शी या संघाला पराभूत केले. अंतिम फेरीत पापरी (ता. मोहोळ) या संघाला १७ गुणांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली व जिल्ह्यात माढा तालुक्याचा दबदबा कायम राखला.
![](https://skpmaharashtranews.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-Image-2024-01-08-at-23.00.02_079d0bb8-1024x629.jpg)
विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षिका माधुरी पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक गणेश गोसावी, शहाजी ताकभाते, सुनील ठोंगे, सौदागर खताळ, अर्चना पांडे यांचे सहकार्य लाभले. या विजयाबद्दल माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव केंद्रप्रमुख महादेव जठार, चिंचोलीचे सरपंच संतोष लोंढे, उपसरपंच स्वाती लेंडवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित लेंडवे, उपाध्यक्ष विशाल लोंढे व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.