महाराष्ट्रविशेषसामाजिक

दिवाळीनिमित्त शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधामिळणार; मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा निर्णय

मुंबई (एसकेपी महाराष्ट्र न्यूज)

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले-

१. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा. त्यामध्ये मैदा आणि पोह्याचा देखील समावेश असणार आहे. (अन्न व नागरी पुरवठा)

२. विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार असून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. (ऊर्जा विभाग)

३. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा समावेश करण्यात आला असून दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. (अल्पसंख्याक विकास विभाग)

४. नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करणार असून ४५ पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे. (विधी व न्याय)

५. इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्यात आली. (गृहनिर्माण)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button